Breaking News

आजचे नवयुवक ऑनलाइन सट्टा आणि मोबाईल चे होत आहेत व्यसनाधीन.

आजचे नवयुवक ऑनलाइन सट्टा आणि मोबाईल चे होत आहेत व्यसनाधीन.  

  





आजच्या युगात नवयुवक मोठ्या प्रमाणात आपला वेळा हा सोशल मीडियावर वाया घालत आहे. त्यामध्ये Youtub, Instagram, व्हाट्सॲप, फेसबूक ऑनलाइन रम्मी अशा वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाइन खेळ आणि ऑनलाइन करमणुकीचे साधने वापरुन मोठ्या प्रमाणात नवयुवक व लहान मुले पण आपला महत्वाचा वेळा वाया घालवत आहेत. 

खर तर आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे. आपण इंटेरनेमध्ये शिकावे तेव्हढे कमी आहे. इंटरनेट वापरुन आपण जगातील सर्व प्रकारची माहिती घेऊ शकतो जगात कोठे काय घडत आहे. हे इंटेरनेटच्या माध्यमातून आपल्याला माहिती घेऊन त्याद्वारे आपण आपला रोजगार पण चालू करू शकतो. इंटरनेटच्या माद्यमातून वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करू शकतो पण तसे न करता तरुण वर्ग मोबाईल मधून इंटरनेट वापर करून वेगळ्याच वेळघालू माध्यमात आपला अमूल्य वेळ वाया घालत आहे. याचा अर्थ असा नाही की आजच्या युवकाने मोबाईल आणि इंटरनेट वापरू नये हे युगाच इंटरनेचे आहे. त्यामुळे इंटरनेट जरूर वापरले पाहिजे. इंटरनेट वापरुन रोजगाराच्या संधी शोधायला पाहिजेत आपण इंटरनेट वापरुन त्याद्वारे कशा प्रकारे रोजगार निर्मिती करू शकतोत हे पहिले पाहिजे. इंटरनेट वापरुन जगातल्या वेगवेगळ्या चालू घडामोडी पहिल्या पाहिजेत जंनेकरून जगात व देशात काय चालू आहे. हे कळेल. 

इंटरनेटचा वापर करून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास मोठी मदत होते. त्यासाठी तरुणाने इंटरनेटचा वापर केला पाहिजे. आणि इंटेरनेटवरच काही करण्याची इच्छा असेल तर यूटूब अकाऊंट करून, गूगल अकाऊंट विडियोच्या माध्यमातून किंवा ब्लॉग च्या माध्यमातून इतरांना वेगवेगळी माहिती देऊन दुसर्‍याचे ज्ञान वाढवण्यास मदत करून त्याद्वारे रोजगार निर्मिती करू शकतो. पण आजचा तरुण असे न करता या इंटरनेट चा  वापर फक्त आणि फक्त टाइमपास साठी करत आहे. तरुणाकडे एक दिवस मोबाईल किंवा इंटरनेट पॅक नसेल तर तो शांत राहू शकत नाही याचा अर्थ असा की, आजचा तरुण हा इंटरनेट आणि मोबाईल च्या व्यसनात अडकला आहे. आणि हे व्यसन आजच्या तरुणाईला बरबाद करत आहे. आजचा तरुण इंटरनेटवर टाईपास करत असतान तो वेगवेळ्या जाहिराती पाहतो त्यापैकी एक सर्वात घातक जाहिरात म्हणजे ऑनलाईन रम्मी यानेतर तर देशात कहर केला आहे.सध्या ऑनलाईन रम्मी रम्मी खेळनारयाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतान दिसत आहे. रमी डाउनलोड करा व हजारो रुपयाची बक्षीसे  मिळवा अशा मोठ्या जाहिराती पाहून या अमिषाच्या जाहिरातीला बळी पडून तरुण रम्मी च्या जाळ्यात तरुण अडकत चालला आहे. 


        सुरवातीला हे तरुण टाइमपास म्हणून हा खेळ खेळतो आणि त्याला वाटले कि, मी आता सर्व शिकलो आहे त्यावेळी हाच तरुण पैसे लाऊन रम्मी खेळतो काही वेळा त्याला त्यामध्ये पैसे येतातही पण एकदा का त्याचे काही पैसे या खेळामध्ये गेले का मग त्याचा खरा खेळ सुरु होतो. परत गेलेले पैसे त्याला आणायचे असतात. त्याकडे रम्मी खेळण्यासाठी पैसे नसले तरी तो कोणत्याही स्तराला जाऊन पैसे उपलब्द करतो आणि परत या खेळात पैसे गमावून बसतात याप्रमाणे हे चक्र चालूच राहते आणि मग हि तरुणाई कर्जबाजारी होऊन बसते. मग काही पर्याय उरत नाही एकतर अभ्यास करून आपल जीवन घडवण्याचा किंवा काहीतरी नौकरी करून पैसे कमवण्याचा हा काळ असो असा हा अमुल्य वेळही या नादात हि तरुणाई गमावून बसते. मग काहीच पर्याय उरला नाही असे लक्षात आल्यावर हाच तरुण गुन्हेगारी या क्षेत्रात प्रेवेश करतो. 


        त्याचप्रमाणे क्रिकेट वरील सटा App, ऑनलाईनओं लुडो , असे कित्तेक जुगाराचे App ऑनलाईन आहेत आणि आजचा तरुण या सर्व जुगारी App च्या दुनियेत अडकून बसला आहे याचाच अर्थ तो त्याचा व्यसनाधीन होऊन बसला आहे. या अशा खेळाने प्रत्येक माणूस आपल्या स्वत च्या वेगळ्याच दुनियेत असतो. आणि हे सर्व होत असताना जीवन घडवण्याची वेळ कधी  निघून गेली हे त्याला कळत नाही. त्यावेळी काही उपयोग नसतो. त्यामुळे तरुणानो वेळीच सावध व्हा असे सट्टे खेळून कधीच कोणी पैसे कमवत नसतो अशा सट्टेबाजी खेळून पैसे कमवले अशा खोट्या जाहिराती दाखवून तुम्हा आम्हाला हे सट्टेबाजी App चे मालक लोक आपल्याला फसवत आहेत. त्यामुळे अशा फसवेगिरी लोकांच्या अमिषाला बळी पडू नका. 

        खरतर आपण ज्यांना आपले सेलिब्रिटी म्हणतो जे आपल्या देशाचे आदर्श आहेत असे सिनेकलाकार, क्रिकेटर, व वेगवेगळ्या खेळातील नामांकित खेळाडू यांना आपण आदर्श मानतो आणि काही पैस्यासाठी ते या असल्या सट्टेबाजी App ची जाहिरात करतात आणि या आदर्श लोकांनी केलेली जाहिरात पाहून जास्त तरुणाई या अशा खेळाकडे वळत आहे अशा या सर्व कलाकारांना आणि खेळाडूंना एक विनंती आहे या अशा सट्टे बाजी App ची जाहिराती करून देशाच्या भावी पिढीला अंधकारात ढकलू नका.

          एकीकडे अड्यावर बसून जे लोक जुगार खेळतात, बाकी कोणताही सट्टे खेळताना पकडल्यावर त्या सट्टे खेळणारयावर व ते सट्टे चालावनार्यावर कारवाही करतात आणि दुसरीकडे शासन ऑनलाईनओंलीने सट्टे चालवणाऱ्याला परवानगी देते याचा अर्थ काय खरेतर सरकारनेच या अशा सट्टे चालवणाऱ्या App बंदी घातली पाहिजे असे सर्व App ऑनलाईन वरून काढून टाकून बरबाद होणाऱ्या तरुणाईला वाचवले पाहिजे अशी सर्व स्तरातील पालक वर्गाची मागणी आहे.

        असे झाल्यास सर्व तरुण या व्यसनातून बाहेर निघेल आणि  यामुळे इंटरनेटची होणारी बदनामी टळेल याच कारणाने आजचा तरुण इंटरनेटच व्यसनी झाला आहे. नाहीतर चांगली माहिती मिळवायला कोणालाही इंटरनेटवर इतका वेळ खर्च होत नाही. आणि झालातरीही त्याचा फायदाच होतो. त्यामुळे सर्व तरुणाला सल्ला असल्या सट्टेबाजी इंटरनेटच्या व्यसनात न बुडता वेळीच जागे व्हा आणि आपण सर्व येणाऱ्या काळात चांगले गीवन जागून पुढील पिढीलाही त्यासाठी मार्गदर्शन करत राहा. 


                                    

www.indianfaster.com

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...