Breaking News

शेतकऱ्यासाठी काटेरी तार कुंपण योजना

शेतकऱ्यासाठी काटेरी तार कुंपण योजना Tar Kumpan Yojana2023काटेरी तार कुंपण योजना Tar Kumpan Yojana2023


            Tar Kumpan Yojana2023 शेतकऱ्यासाठी सरकार हमेशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते जेणेकरून या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सोपे व्हावे आणि त्यातूनच शेतकऱ्यांच्या शेतीचे उत्पन्न वाढावे अशाच प्रकारची आणखीन एक योजना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी चालू केली आहे.

            डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी जन वन विकास व्याप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तसेच अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्याने यांच्या सीमेपासून पाच किलोमीटरच्या अंतरातील संवेदनशील गावामध्ये शेती पिकाचे वन्य प्राण्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर लोखंडी काटेरी तारेचे तार कुंपण 90 टक्के अनुदानावर राबवण्यात येणार आहे.

            राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे किंवा शेतीमध्ये पेरणी केलेल्या पिकाचे जंगली किंवा पाळीव प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी किंवा होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीला लोखंडी तारेचे कुंपण करून पिकाचे व शेतीचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने शेतीसाठी तारकुंपण करणे ही एक योजना आणली आहे.

            शेतकऱ्याने शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेतमालाची पेरणी केल्यानंतर पेरणी केल्यापासून ते पीक काढणीपर्यंत शेतकऱ्यांच्या पिकाचे वेगवेगळे जंगली प्राण्यापासून व पाळीव प्राण्यापासून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते कधी कधी तर या जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे शंभर टक्के नुकसान केले जाते आणि त्या शेतकऱ्याला त्या झालेल्या नुकसानामुळे खूप मोठ्या प्रमाणात तोटा होतो त्या झालेल्या नुकसानामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो याप्रकारे जंगली प्राण्यापासून व पाळीव प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकाचे होणारे नुकसान टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी लोखंडी तारेचे कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांना तार कुंपण योजना ही योजना अमलात आणून शेतकऱ्यांना कुंपण करण्यासाठी शासन अनुदान देत आहे.


            त्यामुळे अशा भागातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि या जंगली किंवा पाळीव प्राण्यापासून पिकाचे होणारे नुकसान टाळावे. सरकारच्या या तार कुंपण योजनेसाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज कोणाकडे करायचा आणि त्या अर्जासोबत कोण कोणते कागदपत्रे जोडायची या संबंधित सर्व माहिती आपण पाहणार आहोत.

        Tar Kumpan Yojana शेतीसाठी तार कुंपण योजना ही डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प यामधून राबवण्यात येत आहे. यामध्ये काटेरी तार कुंपण योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्राण्यापासून किंवा पाळीव प्राण्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी काटेरी तारेचे कुंपण करण्यासाठी सरकारकडून 90 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. म्हणून च महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणारी काटेरी तार कुंपण योजना ही एक महत्त्वाची योजना म्हणून मानली जात आहे.

            ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि ज्या शेतामध्ये लाभ घ्यायचा आहे ते शेत अतिक्रमण केलेले असू नये ते शेत शेतकऱ्याच्या मालकीचे असावे. शेतकऱ्यांना या योजनेमधून लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये जंगली प्राण्यांपासून शेत पिकांचे नुकसान होत असल्याबाबत त्यांच्या गावामध्ये नेमलेल्या ग्राम परिस्थितीकीय समिती व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव आणि त्याचप्रमाणे वनपरिक्षेत्र भिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागेल.

            Tar Kumpan Yojana राज्य सरकारच्या काटेरी चार कुंपण या योजनेमधून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन क्विंटल काटेरी तार आणि त्यासोबत तीस खांब हे 90 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सरकारकडून पुरवण्यात येतील तर राहिलेली दहा टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः खर्च करावी लागणार आहे.

            Tar Kumpan Yojana काटेरी तार कुंपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपला अर्ज पंचायत समितीमध्ये करायचा आहे विहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्याने त्यासोबत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रासह किंवा प्रमाणपत्रासह नेमून दिलेल्या अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करायचा आहे.

राज्य सरकारच्या काटेरी तार कुंपण योजनेसाठी अर्ज करताना अर्जासोबत जोडण्यासाठी खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे लागतील.

➤ सातबारा उतारा

➤ नमुना आठ अ उतारा

➤ आधार कार्ड

➤ गावात नेमलेल्या समितीचा ठराव

➤ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र

➤ ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र

➤ शेतकऱ्याचे जात प्रमाणपत्र


No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...