Breaking News

कांदा चाळ अनुदान

 कांदा चाळ अनुदान Kanda Chal Anudan Yojana


Kanda Chal Anudan Yojana            कांद्याच्या लागवडीसाठी आणि कांद्याच्या उत्पादनासाठी भारत देश हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा कांदा पिकवणारा देश आहे आपल्या देशाची कांद्याची गरज भागून शिल्लक राहिलेला कांदा मोठ्या प्रमाणात बाहेर देशात पाठवला जातो देशांमध्ये सुमारे पाच लाख हेक्टर क्षेत्र कांद्याच्या पिकाखाली येते व 74 लाख टनाच्या आसपास कांदा पिकाची उत्पादन भारतामध्ये होते. त्याचप्रमाणे भारत देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी 26 टक्के च्या आसपास कांदा उत्पादन महाराष्ट्र राज्यामध्ये केले जाते. म्हणजेच जर भारत देशामध्ये दहा लाख टन कांदा उत्पादन झाले तर त्यामध्ये दोन लाख 60 हजार टन कांदा महाराष्ट्रामध्ये उत्पादित होतो. किंवा उत्पादन केले जाते.

कांदा पीक हे जास्त दिवस न टिकणारे पीक आहे. कांदा काढणीनंतर त्याची योग्य वेळी विक्री झाली नाही तर जास्त दिवस राहिल्यामुळे कांदा खराब होतो. आपल्या देशामध्ये कांदा हा दैनंदिन आहारामध्ये वापरला जातो कांद्याचे उत्पादन किंवा कांदा लागवड करण्याची वेळही हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त आहे आणि उन्हाळ्यामध्ये देखील कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकऱ्याच्या शेतीमधून कांदा पिकाची काढणी केल्यानंतर त्या कांद्याला लगेचच बाजारामध्ये चांगला भाव मिळेल याची शक्यता नसते परंतु कांदा पीक हे नाशवंत पीक असल्यामुळे आणि शेतकऱ्याकडे कांदा पिकाची साठवण करण्यासाठी देवस्थान असल्यामुळे शेतकऱ्याला कांदा पिकाच्या काढणीनंतर असेल त्या भावामध्ये कांद्याची विक्री करावी लागते त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कांदा पिकाला योग्य भाव मिळेलच याची खात्री नसते आणि भाव योग्य न मिळाल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होतो.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकाची काढणी केल्यानंतर कांद्याची साठवणूक करण्यासाठी सोय असेल तर शेतकऱ्यांना त्यांचा कांदा काढणीनंतर योग्य भाव नसेल तर तो साठवून ठेवता येईल आणि ज्यावेळी कांद्याला बाजारामध्ये चांगला भाव असेल त्यावेळी तो कांदा शेतकऱ्यांना विक्रीसाठी वापरता येईल त्यामुळे शेतकऱ्यांचा होणारा तोटा थांबेल आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होईल.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा साठवून ठेवण्यासाठी कांदा चाळ असणे गरजेचे आहे परंतु कांदा चाळ बनवण्यासाठी शेतकऱ्याकडे पुरेसे पैसे उपलब्ध नसतात त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवण्यासाठी कांदा चाळ बांधणे याकडे दुर्लक्ष करतात. अशा या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ असणे आवश्यक आहे. म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांना कांदा चा उभारणीसाठी प्रोत्साहन मिळावे व काही प्रमाणात सरकारकडून अनुदान देऊन कांदा चाळ उभारणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करत आहे. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कांदा चाळ अनुदान योजना चालू केली आहे या कांदा चाळ अनुदान योजनेचा राज्यातील जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी सरकारने संबंधित यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत कांद्याचा या योजनेचा सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळावा व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा दीर्घकाळ टिकावा आणि शेतकर्‍यांच्या कांद्याला चांगला भाव मिळून शेतकर्‍याची आर्थिक उन्नती व्हावी.

राज्य शासनाच्या वतीने कांदाचाळ अनुदान योजना २०२३ या आर्थिक वर्षामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कांदा चाळ या योजनेचा लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे कांदा चाळ या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेचाआपल्याला खात्रीशीर लाभ मिळणार आहे.

कांदा चाळ या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍याला शासनाच्या MAHADBT या वेबसाइट वर आपणास ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे. हा अर्ज आपण कोणत्याही ऑनलाइन सेंटर वर किंवा CSC सेंटरवर जाऊन आपला ऑनलाइन अर्ज भरून घेऊ शकतात.

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...