Breaking News

हिवरसिंगा गावच्या तरुणाने बनवले पापड बनवण्याचे मशीन.

हिवरसिंगा गावच्या तरुणाने बनवले पापड बनवण्याचे मशीन.



महिलांच्या हातांना मिळणार आराम.

पुढे पहा                         



         बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हिवरसिंगा हे गाव लोखंडापासून शेतीचे वेगवेगळे अवजारे बनवण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये नावारूपाला आलेले गाव आहे. या ठिकाणी शेतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे लोखंडी अवजारे बनवून मिळतात. काही दिवसापूर्वी हे सर्व बीड जिल्ह्याला माहिती झालेले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील लोकांना हिवरसिंगा या गावाबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही हिवरसिंगा हे गाव सर्वांच्या परिचयाचे आहे.

        काही दिवसापूर्वीच हिवरसिंगा या गावच्या तरुणाने महिलांसाठी अत्यंत जवळचा विषय म्हणजे पापड बनवणे पाहायला गेले तर महिलांना पापड बनवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. तास दोन तास एका जागेवर बसून पापड लाटायचे काम करावे लागते. मग ते दिवसभर उन्हात वाळवायला घालावे लागतात व एक दोन दिवस ते पापड वाळल्यानंतर चांगले बनतात.


         सध्या बऱ्याच महिलांचा समूह एकत्र येऊन हे पापड बनवण्याचे काम करताना पहावयास मिळतात. तसेच महिला बचत गट सुद्धा पापड बनवण्याचा व्यवसाय करताना पाहायला मिळतात. हे करत असताना त्यांना पापड एकत्र येऊन पळपोट आणि बेलन्याने गोलाकार लाटावे लागतात. आणि परत तेच त्याला वाळवत घालने हे सर्व प्रक्रिया खूप वेळ घेते. आणि महिलांना त्यापासून जास्त त्रासही होतो. ही गोष्ट शिवकृपा उद्योग समूहाचे श्रीमंत टाकसाळ यांच्या लक्षात आली आणि त्यांनी पापड बनवण्याची मशीन बनवण्यास सुरुवात केली. आणि अखेर त्यांनी पापड बनवण्याची मशीन यशस्वीरित्या बनवली. मशीन बनवताना त्यांना अनेक संकटे आली मात्र श्रीमंत टाकसाळ यांनी हार न मानता शेवटी माझे एकच मला पापड बनवण्याची मशीन बनवायचीच हे होते. त्यामुळे सर्व संकटांना तोंड देत पापड बनवण्याची मशीन यशस्वीरित्या बनवली ही मशीन बनवण्यासाठी त्यांना सरासरी दीड लाखाच्या आसपास खर्च लागला. 

         या मशीनचा वापर करून पापड तसेच पुरी चपाती भाकरी पाणीपुरी समोसा अशा बऱ्याच प्रकारचे साहित्य अगदी चांगल्या प्रकारे बनवता येतात. आणि ते बनवणे एकदम सोपे झाले आहे. या मशीन द्वारे एक किलो डाळीचे पापड अगदी पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार होतात. अशी माहिती शिवकृपा उद्योग समूहाचे श्रीमंत टाकसाळ यांच्याकडून मिळाली.

व्यवसाय करण्याची तयारी असेल तर या मशिनद्वारे पापड बनवून त्याची पॅकिंग करून आपल्या तालुक्यातील दुकानदाराला आपल्या मालाची जाहिरात करून त्यांना त्यांच्या दुकानावर आपला माल विक्रीसाठी देऊन चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळू शकते. 

1 comment:

  1. शिवकृपा उद्योग समउहआच्यआवतईनए राबविलेला अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे,यातून टाइम व मणुष्यबल दोहों ची बचत होते आहे.

    ReplyDelete

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...