Breaking News

जिल्हा परिषद पद भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश

जिल्हा परिषद पद भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश 


स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍याना आनंदाची बातमी राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 75 हजार  वेगवेगळ्या विभागातील पदांची सरळ सेवेने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या पदाची मिळून 19 हजार पदाची भरती करण्यात येणार आहे. पण ही प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही, म्हणून ग्रामविकास विभागाने नाराजीचे सुर काढत भरती प्रक्रिया या विषयाला प्रथम प्रधान्य देण्याचा आदेश काढण्यात आला आहे. 

ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील "क" वर्गातील अठरा हजार नऊशे एकोणचाळीस पदे सरळ सेवेने भरण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आतापर्यंत भरती प्रक्रिया सुरू होणे गरजेचे होते परंतु तसे न झाल्यामुळे  सर्व भरती प्रक्रियावर लक्ष ठेवून बसलेल्या उमेदवारमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भरती प्रक्रिया या विषयाला प्रथम प्राधान्य द्यावे असा आदेश ग्रामविकास विभागाने दिला आहे. 

पुढे वाचा  

सरळ सेवा भारतीचा कृती आराखडा तयार करून आतापर्यंत ग्रामविकास विभागाने पदभारतीसाठी कोणती कार्यवाही केली. अशीही विचारणा करण्यात आली. तसेच लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करून निवड झालेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध होईपर्यंत एक हेल्पलाइन चालू करून त्याची माहिती उमेदवारला वेळोवेळी द्यावी या पदभरतीमध्ये सर्व जिल्हा परिषदानी संक्षिप्त टिपन्नी तयार करावी. भरती प्रक्रियाचा कृती आराखडा तयार करून कार्यालच्या दर्शनीय भागात लावावा जनेकरून याची माहिती सर्व उमेदवाराला सहज मिळेल. असेही ग्रामविकास विभागाने या आदेशात म्हटले आहे. 


आतापर्यंत असे घडले.

ग्रामविकास विभागाने 12  हजार पदांसाठी 2019 मध्ये सरळ सेवा भरतीची जाहिरात दिली होती यासाठी 12 लाख उमेदवारांची परीक्षा शुल्कापोटी 25 कोटी रुपये शासनाकडे जमा झाले होते शासनाने ही प्रक्रिया कोरोना या महाभयंकर महामारी मुळे रद्द केली होती त्यानंतर सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी राज्यभर आंदोलने केल्यानंतर शासनाने पुन्हा कार्यवाही सुरू केली कोरोनासाठीचा फटका बसल्यामुळे सर्व उमेदवारांना दोन वर्ष वयाची सवलतही त्यानंतर दिली गेली तसेच या परीक्षा घेण्यासाठी आयबीपीएस आणि टीसीएस या दोन कंपन्यांची नेमणूक करण्यात आली यासाठी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली तरीही भरती प्रक्रिया सुरू झाली नसल्यामुळे राज्यातील उमेदवार नाराज आहेत त्यामुळेच भरती प्रक्रिया जलद गतीने राबवावी असा आदेश ग्राम विकास विभागाने दिला आहे.

अखेर पदभरती प्रतीक्षा संपली 

राज्यातील स्पर्धा परीक्षा करणारे सर्व उमेदवार चार-पाच वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या भरती प्रक्रियेकडे लक्ष ठेवून आहेत. कधी भरती प्रक्रिया चालू होते आणि कधी मी या प्रक्रियेमध्ये सहभागी होतो. असे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व उमेदवारांना गेल्या चार पाच वर्षापासून वाटत होते परंतु भरती प्रक्रिया चालू होण्यास राज्य शासन काही तयारी दाखवत नव्हते. आणि यदा कदाचित एखादी भरतीची जाहिरात निघाली तरीही ती भरती प्रक्रिया कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रद्द व्हायची. आणि तासनतास स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करणाऱ्या उमेदवाराचा अभ्यास करण्याचा इंटरेस्ट कमी व्हायचा पण तरीही त्यांना अभ्यास केल्याशिवाय पर्याय नव्हता हे माहीत होते म्हणून सर्व उमेदवार मनामध्ये मोठी आशा धरून खूप मेहनतीने अभ्यास करत होते, कारण त्यांना माहीत होते एक ना दोन तीन वर्षांनी का होईना शासनाला भरती प्रक्रिया ही करावीच लागणार, आणि उशिरा का होईना शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या खात्यामधील 75000 वेगवेगळ्या पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसारच आता जिल्हा परिषदेमधील 19 हजार क वर्गीय पदांची पद भरती करण्याचा आदेश संबंधित विभागाला देण्यात आला. त्यामुळे पद भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व उमेदवारांना आता पद भरतीची प्रतीक्षा संपली असे वाटू लागले, आणि सर्व उमेदवार जिद्दीने अभ्यासाला लागले.

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...