Breaking News

PM किसान योजनेतून शेतकर्‍याला या पुढील हप्ता 2000 नाहीतर 4000 रुपये मिळणार आहे.

 PM किसान योजनेतून शेतकर्‍याला या पुढील हप्ता 2000 नाहीतर 4000 रुपये मिळणार आहे.राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी


संपूर्ण भारतात केंद्र सरकारने यापूर्वीच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना नावाने शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी योजना चालू केली. या योजनेमधून शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये पेन्शन सरकारने चालू केली आहे प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना पेन्शन मिळत होती. ही योजना चालू करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश देशातील शेतकऱ्यांना थोडा आर्थिक मदतीचा हातभार लावून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हाच होता.

 शासनाच्या लाभदायक योजना

पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना ठरली आहे.

भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी  PM किसान योजनेतून 6000 रुपये वार्षिक पेन्शन शेतकऱ्यांना देऊ केली परंतु महाराष्ट्र राज्य सरकार ला PM किसान योजनेत मिळणाऱ्या वार्षिक सहा हजार रुपये यामध्ये वाढ करण्याचे लक्षात आले. राज्य सरकारला वाटले. PM किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये भेटतात पण यामध्ये राज्य सरकारचा पण काहीतरी वाटा देऊन शेतकऱ्यांना अजून थोडी मदत करावी व शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनाला थोडा हातभार लावावा या कारणाने राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये PM किसान योजनेमध्ये राज्याचा प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये वार्षिक याप्रमाणे हिस्सा देण्याचे बैठकीत ठरले.

त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना PM किसान योजनेतून आता 6000 रुपये नाही तर बारा हजार रुपये वार्षिक पेन्शन मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये पेन्शन शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकार मिळवून देणार आहे त्याची रक्कम प्रत्येक चार महिन्याला चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.

नवीन नियमांनुसार शेयकर्‍यांना 4000 रु हप्ता कधी मिळणार ?

यामध्ये राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांचा चांगलाच फायदा होणार आहे PM किसान योजनेचा यापुढील सरकारने लागू केल्याप्रमाणे 4000 रुपये प्रति चार महिने हा पेन्शनचा हप्ता जून महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


भारत देश हा कृषीप्रधान देश आहे सर्व जगाची आर्थिक व्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो. परंतु विविध कारणामुळे शेतकऱ्यांना हमेशा बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांना शेती करून स्वतःच्या कुटुंबाची उपजीविका भागवून सर्व देशवासीयांच्या उपजीविकेचा विचार करून त्याला शेतीत राबवावे लागते. व हे करत असताना शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात काबाडकष्ट करावे लागते परंतु फक्त काबाडकष्ट करणे म्हणजेच शेती करणे नाही त्यासाठी पाणी, औषधे, खत, बी- बियाणे या सर्व गोष्टी लागतात. आणि या सर्व गोष्टी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागते. आणि मगच शेती पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात मेहनत करावी लागते. एवढे केल्यानंतरही शेतकऱ्यांची शेती चांगल्या प्रकारे पिक निघण्यासाठी  निसर्गावर अवलंबून राहावे लागते. म्हणजेच योग्य प्रमाणात पाऊस झाला तरच पीक योग्य येते. कधी अतिवृष्टी कधी कमी पाऊस कधी पिकावर येणाऱ्या किडी तरी पिकावर येणारे रोग यासारख्या दुर्घटनामुळे शेतकऱ्यांचे तयार झालेले पिके वाया जातात. आणि या दुर्घटना न होता शेतकऱ्यांचे पिके चांगली आले तरीही शेतकऱ्यांच्या झालेल्या खर्चाच्या आणि त्याने केलेल्या काबाडकष्टाच्या दृष्टीने शेतकऱ्याच्या मालाला योग्य अशी किंमत मिळत नाही. 

या सर्व बाबींचा विचार करून केंद्राने व राज्याने वरील प्रकारची शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची योजना चालू करून शेतकऱ्यांना थोडीफार आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

➤ 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना मिळणार या योजनेचा लाभ.

➤ या योजनेसाठी 6900 कोटी रुयापायांचा भार राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार .

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...