Breaking News

महाराष्ट्र सरकारची बियाणे अनुदान योजना

 महाराष्ट्र सरकारची बियाणे अनुदान योजना

Biyane Anudan Yojana

            Biyane Anudan Yojana महाराष्ट्रामध्ये सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत आहे त्याचप्रमाणे बियाणे अनुदान योजना ही एक योजना राज्य सरकार राबवताना दिसत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे किंवा वेगवेगळ्या पिकाची बियाणे अनुदानावर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तरी या योजनेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा. Biyane Anudan Yojana

            राज्यातील जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या सर्व प्रकारच्या मशागती करून खरिपाच्या पेरणीसाठी जमिनी तयार करून ठेवल्या आहेत. जून महिन्यामध्ये पेरणी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. परंतु खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात खते आणि बी बियाणे यावर खर्च करावा लागतो. राज्यातील शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणी मध्ये होणाऱ्या खर्चामध्ये काही प्रमाणात सवलत मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना पेरणीसाठी अनुदानावर बी बियाणे मिळावे याकरिता बियाणे अनुदान योजना राबवण्याचे निश्चित केले आहे.

            Biyane Anudan Yojana बियाणे अनुदान योजना 2023 या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टलवर आपला अर्ज बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन करायचा आहे. बियाणे अनुदान योजनेमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सोयाबीन मूग तुर उडीद मका कापूस इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचे बियाणे अनुदानावर मिळणार आहेत. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. Biyane Anudan Yojana

            राज्य सरकारच्या बियाणे अनुदान योजनेमधून शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणांसाठी 50% पर्यंत अनुदान मिळणार आहे तसेच पीक प्रात्यक्षिकासाठी जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे अनुदान मिळणार आहे.

            Biyane Anudan Yojana बियाणे अनुदान या योजनेमधून दोन प्रकारचे बियाणे राज्यातील शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत यामध्ये प्रमाणित बियाणे आणि प्रात्यक्षिक बियाणे प्रमाणित बियाणे म्हणजे त्यावर प्रक्रिया करून अस्सल बियाणे किट आहे जे शेतकऱ्यांना अनुदानावर वितरित केले जातात तर प्रात्यक्षिक बियाणे तसेच खते आणि औषधे गावातील काही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जातात.

             Biyane Anudan Yojana त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून बियाणे अनुदान योजनेचा लाभ घ्यावा यामध्ये हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की बियाणे अनुदान योजना ही योजना 2020 च्या खरीप हंगामासाठी उपलब्ध आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया चालू आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या या बियाणे अनुदान योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. राज्य सरकारच्या बियाणे अनुदान योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या संबंधित शासकीय कार्यालयाशी संपर्क करून सविस्तर माहिती मिळवू शकता. Biyane Anudan Yojana

            राज्य सरकारच्या बियाणे अनुदान योजनेच्या मदतीने राज्यातील शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे तसेच पीक प्रात्यक्षिक बियाणे उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणी मध्ये सवलतीच्या दरामध्ये बियाणे उपलब्ध होऊन खरीप 2023 ची पेरणी करणे सोपे होईल. बियाणे अनुदान योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सरकारकडून आव्हान करण्यात येत आहे ऑनलाइन अर्ज दाखल करून या योजनेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना घेता येईल बियाणे अनुदान योजना ही फक्त खरीप 2023 साठी सरकारकडून उपलब्ध करण्यात आली आहे.


बियाणे अनुदान योजनेचा उद्देश Biyane Anudan Yojana

राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी खरीपाच्या पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्यामध्ये जमिनीच्या मशागती पासून ते बी बियाणे खरेदी खते खरेदी तसेच औषधी खरेदी इत्यादी प्रकारावर शेतकऱ्यांचा भरपूर प्रमाणात खर्च होतो. शेतकऱ्यांच्या हंगामातील पेरणीसाठी या होणाऱ्या खर्चावर थोड्या प्रमाणात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनुदान स्वरूपात मदत उपलब्ध करून देणे यासाठी राज्य सरकारने बियाणे अनुदान योजना राज्यामध्ये राबवत आहेत.

बियाणे अनुदान योजनेमध्ये अर्ज कसा करावा Biyane Anudan Yojana

राज्य सरकारच्या बियाणे अनुदान योजनेसाठी शेतकरी मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहे.तसेच जवळच्या कोणत्याही ऑनलाईन सेंटरवर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात.

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...