कांदा चाळ योजनेला रोजगार हमी योजनेची जोड
कांदा चाळ योजनेला रोजगार हमी योजनेची जोड MREGS
Kanda Chal Yojana MREGS 2023
राज्यातील शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीसाठी या आधी कृषी विभागाकडून महाडीबीटी मार्फत कांदा चाळ योजना राज्यामध्ये चालू होती आणि आहे.
परंतु नुकताच कांदा चाळ विषयी सरकारने नवीन अनुदान आणि नवीन स्वरूपाची योजना चालू केली आहे. यादी डीबीटी मार्फत कांदा चाळ उभारणीसाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदान दिले जात होते परंतु हे अनुदान कांदा चाळ उभारणीसाठी पुरेसे अनुदान नव्हते या अनुदानामध्ये शेतकऱ्यांना कांदा चाळ बनवण्यासाठी खूप अडचणी येत होत्या या सर्वांचा विचार करून राज्य सरकारने कांदा चाळ योजना ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती रोजगार हमी मंत्री भुमरे यांनी दिली आहे.
Kanda Chal Yojana MREGS कांद्याची लागवड चांगल्या पद्धतीने करण्यासाठी किंवा राज्यातील शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन जास्त प्रमाणात घ्यावे म्हणून कांदा चाळ बांधकामासाठी 1,60,367 इतके अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
महाराष्ट्र राज्यातील बरेच शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतात. परंतु कांदा साठवणुकीसाठी शेतकऱ्यांकडे सुविधा उपलब्ध नसते त्यामुळे एक तर शेतकऱ्याचा कांदा पावसामुळे वायाला जातो किंवा त्यांच्या कांद्याला योग्य बाजार भाव मिळत नाही त्यामुळे कांद्याचे उत्पादन भरपूर प्रमाणात निघाले तरीही त्या खांद्याला चांगला बाजार भाव न मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कांद्याच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तोटा सहन करत असतो. कांद्याचे पीक हे नाशिवंत पीक असल्यामुळे कांद्याची योग्य पद्धतीने साठवणूक न केल्यास कांदा पीक लवकर खराब होते. तसेच कांदा पिकाची योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास कांदा पीक हे भरपूर दिवस टिकून राहते त्यामुळे ज्यावेळी कांद्याला बाजारामध्ये योग्य भाव असेल त्यावेळी शेतकरी आपल्या कांद्याची बाजारामध्ये आवक वाढवून योग्य प्रमाणात भाव मिळू शकतात.
Kanda Chal Yojana MREGS या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कांद्याच्या पिकाची साठवणूक करण्यासाठी कांदा चाळ अनुदान योजना नव्याने आणि अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करून व या योजनेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेची साथ देऊन योग्य पद्धतीने चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रोजगार हमी मंत्री भुमरे यांनी असे सांगितले आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना या योजनेअंतर्गत कुशल कामगारांना त्यांच्या कामासाठी 96 हजार 220 इतका मोबदला मिळेल याशिवाय कुशल कामासाठी ६४१४७ रुपये इतके अनुदान कांदा चाळ उभारणीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा या अंतर्गत सर्व साहित्याच्या खर्चासह एकूण अनुदान एक लाख साठ हजार 367 रुपये इतके मिळणार आहे.
Kanda Chal Yojana MREGS सुरुवातीला महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना या योजनेमधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ अनुदान योजना राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे सरकारचे धोरण आहे. तरी महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधून मिळणाऱ्या कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेतामध्ये निघणाऱ्या कांद्याच्या उत्पादनाचे योग्य पद्धतीने साठवणूक करून योग्य वेळी कांद्याची विक्री करावी म्हणजेच कांद्याच्या उत्पादना मधून राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळेल.
यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने मधून मिळणाऱ्या कांदा चाळ अनुदान योजनेविषयी नवीन येणाऱ्या बातमी विषयी माहिती दिली जाईल.
No comments