मागेल त्याला शेततळे योजना झाली चालू
मागेल त्याला शेततळे योजना झाली चालू
"मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योज"
महाराष्ट्र राज्यामध्ये काही कारणास्तव मागेल त्याला शेततळे ही योजना जवळजवळ मागील दोन वर्षापासून बंद झाली होती त्या कारणाने शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी मोठी अडचण येत होती. परंतु आता राज्य शासनाने मागील त्याला शेततळे ही योजना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या नावाने राज्यांमध्ये परत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमधून महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 13,500 वैयक्तिक शेततळे एका वर्षामध्ये करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. किंवा निश्चित केले आहे. या आधी वैयक्तिक शेततळे या योजनेसाठी जास्तीत जास्त 50 हजार रुपये अनुदान मिळत होते. मात्र राज्य सरकारने आता या योजनेचे अनुदान वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्याशिवाय या योजनेमधून मिळणारे अनुदान आता जिल्हास्तरावरून न मिळता थेट आयुक्तालय स्तरावरून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा करण्यात येणार आहे.
राज्यातील येणाऱ्या अवेळी पावसामुळे किंवा पडणाऱ्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांना होणारी पाणीटंचाई आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे वाया जाणारे पिके त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यापासून शेतकऱ्यांची सुटका होण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील दुष्काळी भागामध्ये शाश्वत पाण्याची उपलब्धता निर्माण व्हावी म्हणून व पाणी टंचाईच्या काळामध्ये कमी पाण्यामध्ये शेतकऱ्यांना पिके घेता यावेत किंवा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभी असलेली पिके त्या शेतकऱ्याला टंचाईच्या काळामध्ये सुद्धा ती पिके जगवता यावीत यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून मागील त्याला शेततळे ही योजना राबवली जात असून या योजनेमधून मागेल त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जात आहे. या योजनेमधून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वैयक्तिक शेततळे झाली आणि त्याचा उपयोग शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळामध्ये झाला परंतु मागील काळामध्ये कोरोना या महामारी मुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधीची अडचण झाल्यामुळे राज्य सरकारने 2020 पासून ही योजना बंद केली होती.
मागेल त्याला शेततळे ही योजना बंद झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेततळे उभारणीसाठी अनुदान मिळणे बंद झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. शेतकऱ्यांसाठी शेततळे उभारण्यासाठी राज्यातील शेतकरी वेळोवेळी ही योजना कधी सुरू होईल याबाबत संबंधित विभागाकडे चौकशी करत होते. शेतकऱ्यांना शेततळे करण्यासाठी राज्यांमध्ये योजना चालू नसल्याने शेतकऱ्यांना शेततळे करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. हे सर्व शासनाच्या निदर्शनात आल्यामुळे राज्य सरकारने मागील त्याला शेततळे ही योजना परत सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि शासनाने मागील त्याला शेततळे ही योजना मार्च 2022 मध्ये घोषणा केली परंतु त्याबाबतच्या नवीन काही सूचना संबंधित विभागाला दिलेल्या नव्हत्या म्हणून सरकारने परत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करत राज्यातील सर्व विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांना याबाबतचे नवीन आदेश दिले मागील त्याला शेततळे ही योजना आता नवीन नावाने राज्यात राबवली जाणार आहे. मागेल त्याला शेततळे ही योजना आता राज्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या नावाने राबवली जाणार आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या योजनेतून राज्यात 13500 करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने निश्चित केले आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या जातीतील प्रवर्गासाठी आरक्षित कोटा आहे निश्चित केला आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमध्ये मागील योजनेसारखेच अनुदान मिळणार आहे परंतु हे अनुदान आता जिल्हास्तरावरून न मिळता थेट आयुक्त कार्यालय स्तरावरून शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात येईल लाभार्थी शेतकरी यांना महाडीबीटी पोर्टलवरूनच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे कमीत कमी 60 गुंठे जमीन असणे आवश्यक आहे. आणि या आधी कोणत्याही योजनेमधून त्या शेतकऱ्याने शेततळ्याचा लाभ घेतलेला असू नये. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या योजनेचा लाभ देताना प्रथमतः अपंग व महिला या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे
संबंधित विभागाला लाभार्थी अनुदानास पात्र असल्याची खात्री झाल्यावर त्या लाभार्थ्याला तालुका कृषी अधिकारी शेततळे या कामाचे काम चालू करण्याचे आदेश व पूर्वसंमती पत्र देतील आणि या कामाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावरून या कामासाठी गठीत केलेली समिती काम करेल.
मागेल त्याला शेततळे ही योजना मागील तीन वर्षापासून बंद असल्याने शेतकऱ्यांना शेततळे करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु ही योजना आता राज्य शासनाने परत चालू केल्यामुळे राज्यामध्ये वैयक्तिक शेततळे बांधणीसाठी शेतकरी पुन्हा जोमाने काम करणार आहेत. आणि त्यामुळे अवेळी येणाऱ्या पावसामुळे किंवा पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचे पीक निघून शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्याने जवळपास असणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत संग्राम केंद्रे किंवा कोणत्याही ऑनलाईन केंद्रामध्ये जाऊन आपला ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे.
No comments