Breaking News

महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना 2023 | Lek Ladki Yojana Maharashtra

महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना 2023 | Lek Ladki Yojana Maharashtra

माझी कन्या भाग्यश्री योजना

Lek Ladki Yojana Maharashtra


  भारत सरकार आणि वेगवेगळे राज्य महिला आणि मुलीसाठी वेगवेगळ्या महत्वाच्या योजना राबवत आहेत. बर्यारच योजनांच्या माध्यमातून देशातील आणि राज्यातील मुलींना आर्थिक मदतही केली जात आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात "लेक लाडकी योजना" सुरू करण्याचे निश्चित करून तसी घोषणा देखील केली आहे. या या योजनेमध्ये मुलगी जन्माला आल्यापासून त्या मुलीचे वय वर्षं 18 होईपर्यंत त्या मुलीला महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी आर्थिक मदत दिली जाईल. मुलीचा जन्म झाल्यापासून ते त्या मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्या मुलीला टप्याटप्याने एकुण रक्कम 75 हजार रुपये महाराष्ट्र शासनाकडून त्या मुलीस मिळतील. लेक लाडकी योजनेंमध्ये  मुलीचा जन्म झाला की, लगेच पाच हजार रुपयांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. आणि त्या मुलीचा पहिलीच्या वर्गात प्रवेश केल्यावर लगेच राज्य सरकार त्या मुलीला चार हजार रुपये आर्थिक मदत देणार आहे. 

तसेच मुलीचे पाचवीच्या वर्गाचे शिक्षण पूर्ण करून सहावीच्या वर्गात प्रवेश केला की, त्या मुलीला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाईल. तसेच 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून अकरावीत गेल्यावर त्या मुलीला आठ हजार रुपये आर्थिक मदत मिळेल. या टप्याने शिक्षण चालू असताना आर्थिक मदत शासनाकडून मिळेलच पण त्या मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिला महाराष्ट्र शासनाकडून 75 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या कुटुंबात मुलगी जन्माला आली आहे त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ज्या कुटुंबाकडे आहे. त्याच कुटुंबाला महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजना 2023 या योजनेचा लाभ घेता येणार  आहे. या योजनेमध्ये मुलीच्या पुढील शिक्षणासाठी पैसे थेट त्या मुलीच्या बँक खात्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून जमा केले जातील. या योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता मुलीचा जन्म सरकारी रुग्णालयातच झाला पाहिजे लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असलेले कुटुंब पात्र राहतील. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या आई वडिलांचे किंवा पालकांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.

लेक लाडकी या योजनेसंबंधीत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023 24 चा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्र राज्यातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी नवीन लेक लाडकी योजनेची संकल्पना मांडून लेक लाडकी योजना 2023 या नावाने चालू करण्याची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून सर्व स्तरातील समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना शासनाकडून आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने ही योजना चालू करण्यात येत आहे. लेक लाडकी योजनेमध्ये मुलीच्या जन्मापासून ते मुलीच्या शिक्षणापर्यंत मुलीला आर्थिक मदत शासनाकडून केली जाईल ही मदत मुलगी 18 वर्षाची पूर्ण होईपर्यंत सरकारकडून केली जाईल ही मदत विविध वयोगटातील वेगवेगळ्या वर्गानुसार दिली जाईल. एक लाडकी योजना विशेष करून महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी चालू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत करून महाराष्ट्र राज्यात महिला सक्षमीकरणाला जोर मिळू शकतो. या योजनेचा लाभ कसा घ्यावा या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत हे आपणास खाली पाहावयास मिळेल.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या घोषणा करण्यात आले आहेत. महिलांचे सक्षमीकरण त्यांचा विकास आणि महिलांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकार अत्यंत महत्त्वाचे पावले उचलत आहे राज्यात श्रीभूनहत्या त्याचप्रमाणे समाजात महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो यामुळे आजही अनेक महिला स्वावलंबी असल्याच्या दिसून येत नाही. म्हणूनच हे चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनाने सरकारकडून मोठ्या प्रमाणात केले जात असताना दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत येणाऱ्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला त्या वेळी अर्थमंत्री फडणवीस यांनी महिलाचे सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात अनेक महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली या योजनेमध्ये लेक लाडकी ही योजना सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आणि महत्त्वाची असल्याचे दिसून आले. शासनाच्या या नवीन योजनेचा लाभ वर उल्लेख केल्याप्रमाणे राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींनाच मिळणार आहे.

महाराष्ट्रात लेक लाडकी योजना 2023 चालू करण्याची घोषणा अर्थमंत्री श्री फडणवीस यांनी मुलींच्या सक्षमीकरणासाठी 2023 24 या आर्थिक वर्षात विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणात केली लेक लाडकी या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबात जन्म घेतलेला मुलींना लेक लाडकी 2023 या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये मुलीच्या जन्मापासून ते मुलगी 18 वर्षे वयाची होईपर्यंत त्या मुलीला पाच हप्त्यांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यामुळे शासनाकडून ही मदत मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत शक्यतो कोणतीही अडचण राहणार नाही. त्यामुळे या समाजातील मुलीबद्दल जी नकारात्मक विचारसरणी आहे. ती बदलण्यास मदत होऊ शकते लाडकी योजनेतून मुलींच्या सामाजिक आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्यास निश्चित मदत होईल आणि व गर्भलिंग तपासणी करून होणाऱ्या भ्रूणहत्याला यासारख्या समाज विद्रोही गुन्हेगारींना आवाक्यात आणण्यास निश्चित मदत होईल. तसेच लेक लाडकी योजना 2023 ही मुलींचे भविष्य सुधारण्यासाठी उपयोगी ठरेल या सोबतच महाराष्ट्र राज्यातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत ही दिली जाणार आहे.

लेक लाडकी 2023 ही योजना नेमकी काय आहे?

लेक लाडकी योजना यामध्ये मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या नावावर पाच हजार रुपये राज्य शासन जमा करणार आहे आणि त्यानंतर मुलगी चौथीच्या वर्गात प्रवेश केल्यानंतर चार हजार रुपये शासन मुलीच्या नावावर मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे. त्याचप्रमाणे मुलगी इयत्ता सहावी मध्ये प्रवेश केल्यानंतर मुलीच्या नावावर शासन 6000 हजर रूपये जमा करणार आहे. आणि ती मुलगी 11वी मध्ये गेल्यावर मुलीच्या बँक खात्यात 8000 रुपये शासनाकडून जमा करण्यात येतील . तसेच त्या मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुलीचे शिक्षण, सांभाळ व इतर खर्च भागवणे राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा फायदा होईल.

लेक लाडकी योजना 2023 फायदे आणि वैशिष्ट्ये

➤ लेक लाडकी ही योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली आहे, त्यामुळे राज्यातील मुलींना या योजनेचा लाभ               मिळणार आहे.

➤ लेक लाडकी योजनेत शासनाने वेगवेगळ्या टप्याने वेगवेगळी रक्कम निश्चित केली आहे, त्याप्रमाणे या योजनेचा       लाभ मिळणार आहे.

➤ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज सादर करावा लागेल.

➤ या योजनेमध्ये पिवळी व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना लाभ मिळणार आहे.   

➤ यामुळे समाजातील मुलींबद्दल असमानता दूर करण्यास मदत होईल.   

➤ या योजनेमुळे राज्यातील मुलीं संबंधित सकारात्मक विचारधारा विकसित होईल .

➤ या योजनेमुळे गरीब कुटुंबातील मुलगी त्या कुटुंबांना ओझे होणार नाही.

➤ मुलीचा जन्म सरकारी दवाखान्यात झाला पाहिजे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मुलीच्या जन्मा नंतर               लगेचच अर्ज करावा लागतो.

➤ या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांचे बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे.

    लेक लाडकी योजना 2023 आवश्यक कागदपत्रे

➤ मुलीचे आई वडील यांचे आधार कार्ड 

➤ मुलीचे जन्म प्रमाणपत्र 

➤ शिक्षणाशी संबंधित माहिती असलेले कागदपत्र   

➤ आई वडील यांचे महाराष्ट्राचे रहिवाशी असलेले पुरावे 

➤ वडील यांचा उत्पन्नाचा दाखला 

➤ पासपोर्ट आकाराचा फोटो  

➤ मोबाईल नंबर , रेशन कार्ड

      लेक लाडकी योजना अधिकृत वेबसाइट

        या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. परंतु शासनाकडून अधिकृत वेबसाइटआजपर्यंत सुचवली नसल्यामुळे त्यासाठी थोदा वेळ लागण्याची शक्यता आहे.  अधिकृत वेबसाईट जाहीर होताच त्याचे अपडेट सर्वांना मिळेल. 

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...