Breaking News

हमालाच गाव ठरल देशासाठी आदर्श

हमालाच गाव ठरल देशासाठी आदर्श 

रोजगार हमी शेतकर्‍यासाठी संजीवनी,  तुती लागवडीतून(रेशीम उद्योग) रुई गावाचे पाचशे ते साडेपाचे शेतकरी महिन्याला कमवू लागले साडे तीन कोटी. 


आजच्या काळात शेतकरी शेतात पारंपारिक शेती करताना त्याला भरपूर अडचणी येतात शेती करताना शेतकर्‍याला भरपूर अंग मेहनत तर करवीच लागते त्यांतर त्याला अत्यंत महागाई वाढल्यामुळे खूप जास्त किमतीचे बी-बियाणे, खते, फवारणीसाठी औषदे खरीदी करावे लागतात हे सर्व करून पीक लागवड केल्यानंतर ते पीक चंगाले येईलच याची पीक काढणी करून घरी येईपर्यंत खात्री नसते कारण शेती ही अंग मेहनतीपेक्षा निसर्गावर अवलंबून असते कधी पाऊस न पडणे कधी अती पाऊस होणे तर कधी गारपीठ, कधी शेतमालवर येणार्‍या किडी व रोग अशा वेगवेगळ्या कारणाने शेतकर्‍याच्या पिकाचे भरपूर नुकसान होते. आणि त्यातून कधी निसर्गाने साथ दिली व शेतकर्‍याला चांगला भरपूर शेतमाल पिकला तर त्याला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी सातत्याने कर्जबारीपणाच्या झळा सोसत आहे. 
हे सर्व होत असतान गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यणे दाखऊन दिले आहे की, अभ्यास करून जर शेती केली तर शेतकरी कर्जबाजारी न होता लखपती सहज होऊ शकतो. या गावचे सरपंच कालिदास नवले आणि गावातील शेतकर्‍यांनी तुती लागवडीतून(रेशीम उद्योग) चांगल्या प्रकारे पैसा मिळतो रुई या गावातील साडेपाचशे च्या जवळपास शेतकरी महिन्याला साडेतीन कोटीचे उत्पन्न कामवू लागले आहेत. देशात सर्वात जास्त तुती लागवड करणारे हे गाव असू शकते. त्यामुळे हे गाव तुती लागवडीसाठी इतर शेतकर्‍याने बोध घ्यावा असे आदर्श ठरले आहे. 
रुई हे गाव बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात वसलेले आहे. तेथेल लोकसंख्या जवळपास तीन हजार एव्हढी आहे. या गावात आठशेच्या आसपास शेतकरी संख्या आहे. पहिले पारंपारिक शेती करण्यावर या शेतकर्‍याचा भर असायचा त्यामुळे अंग मेहनत भरपूर करवीच लागत होती सोबत खर्चही भरपूर व्हायचा त्या तुलनेत उत्पन्न होत नव्हते. त्यामुळे शेतकर्‍याला दरवर्षी संघर्ष करून आर्थिक मार्ग शोधावा लागत होता. त्याच काळात गावातील पाच सात शेतकरी तुतीची लागवड करत होते. या गावाला हमालाचे गाव म्हणतात कारण या गावातील अडीचशे ते तीनशे शेतकरी आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी कापसाच्या जिनिंग मध्ये हमाली करत होते एकाच गावातील एव्हढे लोक हमाली करत होते, म्हणून या गावाला जिल्ह्यात हमालाचे गाव म्हणून ओळखले जाते. मागच्या अनेक वर्षापासून गावाची झालेली ओळख पुसण्याचे काम खर्‍या अर्थाने सरपंच वनवे यांनी केली. 2017 ची ग्रामपंचायत ताब्यात आल्यानंतर त्यांनी गावातील शेतकर्‍यांध्ये विश्वास निर्माण करून शेतकर्‍यांना शेतात तुती लागवड कारण्यासाठी प्रोत्साहित केले. आज गावातील तब्बल साडेपाचे शेतकर्याणी 480 हेक्टर पेक्षा जास्त तुतीची लागवड केलेली आहे. या सर्व शेतकर्‍याला मिळून तीन साडेतीन कोटी उत्पन्न महिन्याला मिळत आहे. हमाली करणारे हे गाव राज्यातच नाही तर देशातील शेतकर्‍यांसाठी आदर्श झाले आहे. 
महत्वाचे म्हणजे या गावातील शेतकर्‍यांसाठी जिल्हा परिषदेचे CEO अजित पवार साहेब हे बीड जिल्ह्यात आल्यापासून त्यांना मार्गदर्शन व मोठी मदत ही करत आहेत. या गावातील प्रेत्येक अडचण सोडवण्यास ते मदत करत आहेत. या गावातील तुती लागवडीचे मॉडल त्यांनी डोळ्यासमोर ठेऊन बीड जिल्ह्यात पाच हजार एकारच्या वर तुती लागवडीचा निर्णय घेतला आहे. आणि त्यानुसार तुती लागवडीचे काम जलद गतीने सुरू आहे. तुती लागवडीसाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी CEO पवार साहेब यांनी रुई गावाचे सरपंच श्री नवले यांच्यावर टाकली आहे. CEO पवार साहेब यांनी या हाती घेतलेल्या आदर्श कामामुळे जिल्ह्यातील शेतकर्यामध्ये नवचेतणा निर्माण होऊन शेकर्‍यांची आर्थिक उन्नती साधणार आहे.   


https://indianfaster123.blogspot.com/2023


No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...