Breaking News

आता पशुविज्ञान पदविका अभ्यासक्रम बारावीनंतर

आता पशुविज्ञान पदविका अभ्यासक्रम बारावीनंतर 


2023-24 या वर्षापासून सुरू होणार प्रवेश प्रक्रिया 


या वर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून दहावीवर आधारित पदविका अभ्यासक्रम बंद केला जाईल. त्याऐवजी बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पशुविज्ञान पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाईल. त्या अनुषंगाने सुविधा असलेल्या संस्थाचालकांना त्याकरिता परवानगी दिली जाईल. त्यासाठीचा अभ्यासक्रम लवकरच तयार केला जाईल. याचा वर्षी अमलबजावणी होईल. 
     

राज्यात बारावीनंतर तीन वर्षं कालावधीचा डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच सत्र आणि एक प्रशिक्षण सत्र असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप राहील. पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी 60 विद्यार्थी प्रतिवर्षं एव्हढी प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे.
                       पशुसंवर्धन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मध्ये याबाबत नुकतीच बैठक झाली. बैठकीमध्ये ठरल्यानुसार महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाद्वारे सध्या पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन हा पदविका अभ्यासक्रम दहावीनंतर राबविला जात होता. त्याची प्रवेश प्रक्रिया 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून बंद करण्यात येईल. या अभ्यासक्रमास यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ विनियममध्ये विहित (प्रवेश घेतल्यापासून कमाल चार वर्ष) कलावधीत अभ्यासक्रम पूर्ण करता येईल . हा अभ्यासक्रम बंद करून आता पदवीकेसाठी बारावीची अर्हता निश्चित केली आहे. 

थोडक्यात महत्वाचे .........

 ➤बारावी विज्ञान शाखेत जीवशास्त्र विषयात उत्तीर्ण आवश्यक. 
 ➤तीन वर्षाचा अभ्यास इंग्रजीतून असणार. 
 ➤सुविधा, मनुष्यबळ, प्रयोगशाळा बाबतचे धोरण "माफसू" ठरविणार. 
 ➤विद्यापीठस्तरावर सहआयुक्त (पशूसंवर्धन) दर्जाचा अधिकारी समावीष्ट सदस्याची समितीप्रस्तावित. 
 ➤संस्थाचालकांना पायाभूत सुविधांची पूर्तता करणे बंधनकारक. 
 ➤निकषांच्या पूर्ततेबाबत पडताळणीसाठी विद्यापीठस्तरीय समिती राहणार. 
 ➤नवीन अभ्यासक्रमाची परीक्षा घेणे, निकाल व गुणपत्रिकेची कार्यवाही सध्याच्या परीक्षा विभागामार्फतच होईल. 
 ➤स्वतंत्र परीक्षा कक्ष स्थापन करण्याबाबत विद्यापीठस्तरावर  ठरविण्यात येईल. 


No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...