Breaking News

जिल्ह्यातील ऊसतोड कामगारची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम - जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे

जिल्ह्यातील ऊसतोड कामगारची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम - जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे 


ऊसतोड कामगाराच्या समस्याबाबत आढावा बैठकीत सूचना 

       जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देता यावेत. यासाठी त्यांची माहिती शासनाच्या विभागाकडे असणे गरजेचे आहे. यादृष्टीने जिह्यामध्ये जिल्हा परिषद, स्वयसेवी संस्था, समाज कल्याण विभाग, गटविकास अधिकारी यांच्या समन्वयाने विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. 20 मे पर्यंत दीड महिना चालणार्‍या या मोहिमेत ऊसतोड कामगारांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येऊन त्यांना ओळखपत्र दिले जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले 
          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात ऊसतोड कामगारांच्या समस्याबाबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे बोलल्या. बैठकीसाठी अप्पर जिल्हाधिकारी(अंबाजोगाई) सुनील यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके , अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त रविंद्र शिंदे यासह विविध विभागाचे अधिकारी आणि स्वयसेवी संस्थेचे प्रतींनिधी हजर होते. 
         जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या, नोणद्णी प्रक्रिया मध्ये ग्रामसेवक व स्वयसेवी संस्थाच्या प्रतींनिधींनी समन्वयाने काम करावे. तालुका निहाय विविध स्वयसेवी संस्थाच्या प्रतींनिधीं ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी प्रत्यक्षात मदत करतील. महा-ई-सेवा केंद्रावर त्यांची ऑनलाइन नोंदणी करून ग्रामसेवकामार्फत त्या नोंदणीस मान्यता दिली जाईल. शासकीय योजनेच्या लाभासाठी या नोंदनिवर आधारित ओळखपत्र संबंधित ऊसतोड कामगारस दिले जाईल, असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी संगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वासुदेव सोळंके यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने या नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या सांगनकीय प्रणालीची माहिती दिली. तसेच ओळखपत्राचा नमूना जिल्हाधिकारी यांना दाखवण्यात आला. 

      ऑनलाइन प्रक्रिया सुरू होताना मागील वर्षी साखर हंगामापूर्वी फक्त पंधरा दिवस मिळाल्याने ऊसतोड कामगारांची पूर्ण नोंदणी होऊ शकली नव्हती आता हे सर्व ऊसतोड कामगार कारखाना स्थलावरून जिल्ह्यात आपल्या मूळ गावी परत आले आहेत त्यामुळे ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यात येणार आहे. यावेळी विविध स्वयसेवी संस्थाच्या प्रतींनिधींनी ऊसतोड कामगार, महिला ऊसतोड कामगार, यांच्या मुलाचे शिक्षण, वसतिगृह आदीबाबत अडचणीची माहिती दिली. जिल्हास्तरावरून व राज्यस्तरावरून यासाठी घेण्यात आलेल्या निर्णायबाबत यावेळी सांगण्यात आले. महिला ऊसतोड कामगाराच्या आरोग्य विषयी योजना पोहचवणे व अडचणी दूर होण्यासाठी त्यांची नोंदणी करून त्यांना स्वंतंत्र ओळखपत्र देण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी बैठकीत उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे, गटविकास अधिकारी ए डी सानप,जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुधीर ढाकने, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर ए शेख, शिक्षणधीकरी एन एन शिंदे, यासह डॉ एस आर कदम, अमित भिंगारे,सुवर्णा निंबाळकर, गिरी, बाजीराव ढाकने, आर जे शेळके व  स्वयसेवी संस्थाचे दीपक नगरगोजे, मनीषा तोकले, तत्वशील कांबळे, जोसेफ, नागेश शिंदे, रेवती धिवार, मनीषा घुगे, मनीषा सतीश स्वामी यांची ऊपस्थिती होती. ऊसतोद कामगारांच्या अडचणी दूर करण्यासाठी यावेळी विविध बाबीवर चर्चा करण्यात आली.
          

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...