Breaking News

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी योग्य सबसिडीवर ट्रॅक्टर खरेदी योजना.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी योग्य सबसिडीवर ट्रॅक्टर खरेदी योजना.

MAHADBT


        नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात जनावराकडून शेती करून घेणे परवडणारा विषय राहिला नाही. आणि जनावराकडून शेती करणे म्हणजे खूप मोठा वेळ पण वाया जातो. आणि शेतकऱ्याला व जनावरांना जास्तीचे कष्ट करावे लागते पण त्याला काही पर्याय नव्हता म्हणून शेतकऱ्याला नावीला जास्तव जनावराकडून शेती करून घ्यावी लागते. कारण शेतकऱ्याला शेती करण्यासाठी ट्रॅक्टर सारखी साधने व त्याला लागणारी अवजारे घेण्याइतपत शेतकरी सक्षम नाही. हे सरकारच्या लक्षात आले आणि शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदीसाठी व त्यासोबत लागणारे अवजारे खरेदीसाठी शासनाने कृषी खात्या कडून योजना अमलात आणली. त्यासाठी शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदीसाठी महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण या योजनेमध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य या घटकासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे गरजेचे आहे.

         अर्ज दाखल केल्यानंतर दाखल झालेल्या अर्जाची कृषी विभाग छाननी करून ऑनलाइन सोडत करून त्यामध्ये आपले नाव आल्यास आपण ट्रॅक्टर खरेदी करून शासनाच्या ट्रॅक्टर खरेदी करता असलेल्या अनुदानासाठी पात्र होऊन आपण ते अनुदान ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर डायरेक्ट आपल्या खात्यावर जमा होण्याची प्रोसेस झाल्यावर अनुदान हे त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होते महाराष्ट्रामध्ये कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना सरकारकडून चालू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश शेतीमध्ये कृषी यांत्रिकीकरणाचा वापर वाढवून शेतीचे उत्पन्न वाढवणे हा आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते ही योजना घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांकडे शेतीचा सातबारा उतारा व आठ अ उतारा असणे आवश्यक आहे. एका वर्षात फक्त एकाच अवजारासाठी अनुदान दे राहील म्हणजे तुम्ही चालू वर्षात ट्रॅक्टर घेतले तर ती तर अवजारासाठी अनुदान देणार नाही एकदा ट्रॅक्टर खरेदीसाठी लाभ घेतल्यास पुढील दहा वर्षे ट्रॅक्टर खरेदीसाठी त्या शेतकऱ्याला अर्ज करता येणार नाही किंवा ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेता येणार नाही. हे संबंधित शेतकर्‍याने लक्षात घ्यावे. 

ट्रॅक्टर खरेदी करणे या घटकासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

➤आधार कार्ड

➤जमिनीचा सातबारा उतारा

 ➤जमिनीचा 8 अ  उतारा 

अर्ज ऑनलाईन केल्यानंतर काही दिवसातच ऑनलाइन सोडत जाहीर होते ऑनलाईन सोडती मध्ये शेतकऱ्याचे नाव आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर तसा SMS प्राप्त होईल त्यानंतर शेतकऱ्याला कृषी  विभागाकडून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती पत्र मिळेल त्यानंतर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी करून त्याचे अनुदान घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे कृषी विभागाला सादर करून आपले अनुदान कृषी विभागाकडून प्राप्त करून घ्यावे.

ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी Mahadbdt.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती घ्या.

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...