या पिकाची शेती करा आणि मिळवा चक्क 60 ते 70 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव.
या पिकाची शेती करा आणि मिळवा चक्क 60 ते 70 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव.
चिया पिकाचे बियाणे |
शेतकऱ्यांना शेतीसाठी आणखी एक चांगला पर्याय
अधिक वाचा
कृषी विकास प्रतिष्ठानच्या धान्य महोत्सवामध्ये जामखेडच्या एका शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेले चिया या पिकाचे एक वेगळे आकर्षण राहिले आहे. त्या शेतकऱ्याच्या माहितीनुसार चिया हे प्रतिक्विंटल 60 ते 70 हजार रुपये प्रमाणे भाव मिळतो हे पीक औषधी पीक आहे. रक्तदाब, मधुमेह, वजन कमी करणे, हाडे मजबूत ठेवणे आणि फुपुसासंबंधित सर्व प्रकारच्या आजारावर औषधी बनवण्यासाठी किंवा औषधी म्हणून रामबाण विलाज आहे.रात्री दोन ते तीन ग्रॅम या पिकाच्या बिया पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास शरीरासाठी अत्यंत फायद्याचे आहे. म्हणून या पिकाला सुपर फूड म्हणून मानले जाते.
हे पीक तेथील महोत्सवाचे आकर्षण ठरले आहे. दुष्काळी भागासाठी वरदान आहे. हे पीक मूळचे मेक्सिको या देशातील आहे. हे पीक कृषी महोत्सवामध्ये विक्रीसाठी महेंद्र बारस्कर राहणार वाघा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथील शेतकऱ्यांनी आणले होते. त्यांनी केलेल्या या प्रयोगाने भल्या भल्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहेत. भारतात प्रतिक्विंटल चांगली किंमत मिळणाऱ्या या पिकाचा त्यांनी यशस्वी प्रयोग केला आहे. हे खरीप हंगामात येणारे पीक आहे. याची लागवड साधारणतः 15 ते 30 नोव्हेंबर दरम्यान केली जाते. हे पीक लागवडीपासून साधारणतः 110 ते 120 दिवसात काढण्यासाठी तयार होते. तुळशीला येणाऱ्या मंजुळासारखे हे पीक दिसते या पिकाला लागवडीसाठी हलकी भारी मध्यम कुठल्याही प्रकारची जमीन चालते पण मध्यम प्रकारच्या जमिनीत हे पीक चांगले येते कमी पाण्यात येणारे पीक आहे. या पिकाला साधारणतः लागवडीपासून चार ते पाच पाण्याची आवश्यकता असते. किंवा चार ते पाच पाण्यात ते काढण्यासाठी तयार होते. अगदी वीस ते पंचवीस दिवस या पिकाला पाणी नाही मिळाले तरी हे पीक वाया जात नाही. त्यामुळे दुष्काळी भागासाठी चिया हे पीक वरदान ठरत आहे. या पिकाला लागवडीसाठी एकरी दीड किलो बियाणे लागते.
चिया पीक |
या पिकाची लागवड शक्यतो बियाणे राखेत किंवा मातीत मिक्स करून फेकून केली जाते हे पीक साधारणतः कमीत कमी आठ ते दहा अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त 30 ते 35 अंश सेल्सिअस इतक्या तापमानात येते. या पिकाची लागवड करण्याआधी जमिनीमध्ये एकरी एक टन शेनखत टाकल्यास पीक चांगल्या प्रकारचे येऊन चांगले उत्पन्न मिळते. हे पीक साधारणतः एक एकर जमिनीमध्ये पाच ते सहा क्विंटल प्रमाणे उतार मिळतो. या पिकाचा वास उग्र असल्यामुळे या पिकाला कोणतेच जनावरे खात नाहीत या पिकावर शक्यतो कोणतेच रोग येत नाहीत त्यामुळे या पिकाला फवारणीची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे या पिकाला रासायनिक खताची पण गरज लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या पिकाची शेती करून कमी खर्चात जास्त उत्पन्न काढून आपल्या आर्थिक स्थिती सुधारायला हरकत नाही.
No comments