Breaking News

आपल्यासाठी योग्य असलेली संधी शोधा - बेस्ट सेलरची शिकवण

 आपल्यासाठी योग्य असलेली संधी शोधा


"हसल :  द पावर टू चार्ज युवर लाईफ विथ मनी मिनिंग अँड मोमेंटम या पुस्तकाचे तीन लेखक आहेत निल पटेल, बॅटरी आणि जोनास कोफलर . हे बेस्ट सेलिंग पुस्तक आपल्याला आपल्या अद्वितीय प्रतिभांशी जुळणाऱ्या संधी शोधण्यासाठी प्रेरित करते.



कृती योजना तयार करा

स्वप्न पाहणे चांगले आहे, पण स्वप्नच  पाहणे योग्य नाही. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हालाही काहीतरी करावे लागेल डे ड्रीमिंग हा इंग्रजी शब्द आहे. यातील अडचण अशी आहे की स्वप्न पाहण्याने इतके समाधान मिळते की ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण प्रयत्नच करत नाहीत. काहीतरी करा कृती योजना करा

यशाची कौशल्य

"हसल" हा शब्द ज्यावर पुस्तकाचे शीर्षक आधारित आहे. त्याचा अर्थ आपल्या ध्येयासाठी जाणीवपूर्वक रणनीतीने कार्य करणे मग ते भले अप्रत्यक्ष असो यात आपण स्वतःला अशा स्थितीत आणतो जिथे भाग्य, संधी, बदल, व इतरांच्या सहकार्याचा फायदा होऊ शकतो यशासाठी हसलिंग हे एक आवश्यक कौशल्य आहे.

एका कामावर फोकस

आपण हे ही लक्षात ठेवावे  की एकाच वेळी सर्व काही मिळू शकणार नाही. आपल्याला अनेक शक्यता व पर्याया मधून निवड करायची आहे. आणि आपले प्रधान्यक्रम ठरवायचे आहेत त्यानंतर आपण आपली एक चांगली योजना बनवू शकतो पुस्तकात म्हटले आहे की, आपल्याला हवे ते मिळविण्यासाठी आपल्याला नियमितपणे छोटी छोटी जोखीम घ्यावी लागते . 

यशाची सूत्र

यशाचे सूत्र आहे यश = हसल + लक + युनिक टॅलेंट म्हणजे यश मिळवायचे असेल तर आपल्या बाजूने नियोजित आणि धोरणात्मक प्रयत्न करा नशीब आपल्या बाजूने वळवा आणि आपल्या अद्वितीय प्रतिभेचा जास्तीत जास्त वापर करा आपण जे करू शकतात ते नक्कीच दुसरे कोणीही करू शकत नाही.

आपली प्रतिभा शोधा

आपल्यापैकी अनेकांना आपल्या अद्वितीय प्रतिभेची जाणीव नसेल. हे किती आश्चर्यकारक आहे आपण खरोखर कशात सर्वोत्तम आहात हे आपल्याला माहित आहे का? जे फक्त तुम्हीच करू शकतात. आपण अद्याप ते शोधून काढले नसल्यास संकोच न करता प्रयोग करा. शिकणे आणि प्रयोगांनी भरलेले जीवन यशापासून दूर राहू शकत नाही.

हे ॲटॉमिक हॅबिट चे युग आहे स्मॉल इज ब्युटीफूल बद्दल बोलले जात आहे आणि मिनी मलिस्टिक अप्रोच चलनात येत आहे हे पुस्तकही आपल्याला एक सूत्र देते स्मॉल एव्हरीडे विन्स जो छोटी पावले उचलतो तो खूप पुढे जातो गरज आहे ट्रॅक वर राहून एका वेळी एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची.

आपल्या वेगळेपणाचा फायदा घ्यावा

आपल्याला कुठेतरी सुरुवात करावीच लागेल सर्वात यशस्वी व्यक्ती सुद्धा शून्यापासून सुरुवात करते मग आपल्याला ज्या गोष्टी आवडतात आणि चांगल्या करू शकतो अशा गोष्टीपासून सुरुवात का करू नये आपल्या वेगळेपणाचा फायदा घ्यावा आपल्या बाजूने आपली गती आपल्या नशिबाला आकार देईल.


                       https://www.indianfaster.com/2023

1 comment:

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...