Breaking News

काय आहे ABHA हेल्थ कार्ड महत्त्वाची माहिती

काय आहे ABHA हेल्थ कार्ड महत्त्वाची माहिती


ABHA हेल्थ कार्ड काय आहे ते कसे काढायचे आणि त्याचे काय फायदे आहे हे सविस्तर रित्या जाणून घ्या.


            ABHA हेल्थ कार्ड म्हणजे जनतेच्या आरोग्य विषयीची एक प्रकारची डिजिटल फाईलच आहे त्याला आपण नागरिकांच्या आरोग्याची कुंडली ही म्हणू शकतो हे कार्ड बनवून घेण्यासाठी सरकारने राज्यातील सर्व जनतेला आवाहन केले आहे.

            या कार्डामध्ये रुग्णांच्या आरोग्य विषयी संपूर्ण माहितीची नोंद ठेवली जाईल जसे की रुग्ण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर त्याला त्याच्या आजाराप्रमाणे किंवा ज्या प्रकारचे लक्षणे असतील त्याप्रमाणे तपासण्या करण्यासाठी सांगतात आणि त्या रुग्णावर योग्य ते उपचार करून डॉक्टर त्यांना त्या केलेल्या तपासण्या आणि उपचारा संबंधित एक फाईल बनवून देतात. त्यामध्ये तपासण्या केलेले सर्व रिपोर्ट आणि त्या रुग्णावर केलेल्या उपचाराची सर्व माहिती उपलब्ध असते परंतु ही सर्व माहिती डॉक्टर पेशंटकडे एका मोठ्या फाईलच्या स्वरूपात देतात आणि ती फाईल रुग्णाला परत कधीही दवाखान्यात जाण्याची वेळ आली की सोबत घेऊन जावे लागते.

            त्याचप्रमाणे ABHA हेल्थ कार्ड आहे या कार्डचा फायदा असा आहे की, कोणताही रुग्ण एकदा दवाखान्यात गेला की, त्या रुग्णाच्या तपासण्या झाल्यानंतर त्या रुग्णाचे सर्व प्रकारचे रिपोर्ट या ABHA कार्ड मध्ये जतन करून ठेवले जातात. ते ऑनलाईन पद्धतीने तसेच डॉक्टर यांनी त्या रुग्णावर केलेल्या उपचाराची सर्व माहिती देखील या कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने जतन करून ठेवले जातात. आणि नंतर तो रुग्ण परत कधीही कोणत्याही दवाखान्यात गेल्यानंतर त्या रुग्णाला कोणतीही फाईल सोबत घेऊन जाण्याची किंवा सांभाळण्याची गरज लागत नाही. म्हणजेच त्या रुग्णाने दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर यांना फक्त ABHA नंबर सांगितला की लगेच डॉक्टरांना त्या रुग्णाबद्दलची सर्व प्रकारची माहिती म्हणजेच त्या रुग्णाची कोणकोणत्या प्रकारची तपासणी झाली आहे आणि त्याचे रिपोर्ट काय आहेत तसेच तो रुग्ण पहिल्या वेळेस या दवाखान्यात गेला होता तेथील डॉक्टरांनी त्या रुग्णावर कोणते उपचार केले आहेत या प्रकारची सर्व माहिती ABHA हेल्थ कार्ड मध्ये साठवून ठेवली जाते.

            त्याच प्रकारे रुग्ण हा कोण कोणत्या योजनेमध्ये बसत आहे आणि याआधी त्या रुग्णाने कोणकोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे या प्रकारची सर्व माहिती ABHA हेल्थ कार्ड मध्ये ऑनलाइन पद्धतीने साठवून ठेवली जाते. याचाच अर्थ असा आहे की ABHA हेल्थ कार्ड हे कोणत्याही रुग्णाचा एक इतिहासच असणार आहे.

            ABHA म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे यामध्ये नागरिकांच्या आरोग्यासंबंधी सर्व माहिती डिजिटल पद्धतीने साठवून ठेवली जाईल.

            ABHA हेल्थ कार्ड हे एक प्रकारे आधार कार्ड सारखेच असेल आणि त्यावर एक चौदा अंकी ABHA नंबर असेल याच चौदा अंकी नंबरचा वापर करून रुग्णाची सर्व वैद्यकीय इतिहास डिजिटल स्वरूपामध्ये साठवून ठेवला जाईल त्यामुळे डॉक्टरांना रुग्णाला कोणत्याही प्रकारची फाईल दाखवण्याची गरज लागणार नाही.

            वर नमूद केल्याप्रमाणे ABHA हेल्थ कार्ड मध्ये कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर विलाज झाला तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला त्यामध्ये त्या रुग्णाच्या कोणत्या तपासण्या करण्यात आल्या आणि त्या रुग्णाला डॉक्टरांनी कोणकोणती औषधे दिली रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत त्याचप्रमाणे रुग्ण हा आरोग्यविषयक कोणत्या योजनेची जोडला गेलेला आहे. या प्रकारची रुग्णाबद्दलची सर्व प्रकारची माहिती या ABHA हेल्थ कार्ड च्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने साठवली जाईल. आणि डॉक्टरांना ती सहजरीत्या उपलब्ध होईल.

            या कार्ड वरील युनिक आयडी चा वापर करून म्हणजेच या कार्ड वरील 14 अंकी नंबरचा वापर करून डॉक्टर तुमच्या आरोग्याची संबंधित सर्व माहिती पाहू शकतील परंतु त्यासाठी रुग्णाच्या संमतीची आवश्यकता अनिवार्य असणार आहे. याशिवाय रुग्णाला जेव्हा वाटेल तेव्हा या कार्ड वरील सर्व प्रकारची आरोग्य विषयक माहिती डिलीट ही करू शकणार आहे.

            त्याचप्रमाणे ABHA हेल्थ कार्ड चा सर्वात मोठा फायदा म्हणजे दवाखान्यात जाताना रुग्णाला आधीच्या डॉक्टरांची चिठ्ठी गोळ्याची कागद किंवा डॉक्टरांनी कोणते उपचार केले आहेत त्या संबंधित कोणताही कागद सोबत घेऊन जाण्याची गरज पडणार नाही.

ABHA हेल्थ कार्ड कोठे आणि कसे बनवायचे

ABHA हेल्थ कार्ड हे सर्वच नागरिक बनवू शकतात यासाठी तुम्हाला शासकीय दवाखाने किंवा खाजगी दवाखाने सामुदायिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा कोणत्याही ऑनलाईन सेंटरवर बनवून मिळेल ABHA हेल्थ कार्ड हे सर्व नागरिक घरबसल्या ऑनलाईन मोबाईल मधून बनवू शकता त्यासाठी तुम्हाला आयुष्यमान भारत डिजिटल मिशन या वेबसाईटवर जाऊन ABHA हेल्थ कार्ड बनवू शकता.

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...