Breaking News

बीड जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना मिळणार खरीप 2022 चा पीक विमा

बीड जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना मिळणार खरीप 2022 चा पीक विमावाळू मिळणार स्वस्त 

2022 या वर्षांमध्ये खरीप हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी या पिकाची पेरणी केली होती आणि सोयाबीन या पिकाचा शेतकऱ्यांनी विहित मुदतीमध्ये पिक विमा ही भरला होता हंगाम 2022 मध्ये सोयाबीन पिके पावसाअभावी वाया गेले होते. परंतु विमा कंपनीने सोयाबीन या पिकाचा बऱ्याच शेतकऱ्यांना विमा देण्यास टाळाटाळ केली होती. सोयाबीन या पिकाचा विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी बीडचे कृषी अधीक्षक अधिकारी जेजुरकर यांनी झालेल्या प्रत्येक बैठकीमध्ये 2022 खरीप हंगामातील सोयाबीन या पिकाचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळण्यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. आणि विमा कंपनी आणि शासनाकडून सर्व कागदोपत्री असणारा पाठपुरावा सातत्याने चालू ठेवला होता.

 विमा कंपनीकडून त्यावेळी असणाऱ्या जिल्हाधिकारी यांनी 47 महसूल मंडळाला पीक विमा देण्याचे मंजूर करून घेतले होते. मात्र अनेक कारणे,अडचणी सांगत सदर विमा कंपनीने 28 महसूल मंडळाला पीक विमा मंजूर करून दिला होता. परंतु 19 महसूल मंडळाला वेगवेगळे कारणे सांगत किंवा त्रुटी काढून पीक विमा नाकरण्यात आला होता. किंवा पीक विमा कंपनीने 19 महसूल मंडळाचा पीक विमा मंजूर केला नव्हता परंतु बीड जिल्ह्याचे जिल्हा कृषि अधीक्षक जेजूरकर साहेब यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी कायम वेळोवेळी कृषि आयुक्त, कृषि मंत्री, मुख्यमंत्री आणि विमा कंपनी यांच्याकडे पाठपुरावा करत राहिले. आणि अखेर राहिलेल्या 19 महसूल मंडळाला पीक विमा मंजूर करून घेतला आहे. पुढील आठ दिवसाच्या आत राहिलेल्या 19 महसूल मंडळातील शेतकर्‍याच्या खात्यावर तब्बल 13 कोटी 53 लाख च्या जवळपास रक्कम 19 महसूल मंडळातील शेतकर्‍याच्या खात्यावर जमा केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

त्यामुळे कृषि अधीक्षक जेजूरकर साहेब हे कायम चांगली प्रशासकीय सेवा देणारे अधिकारी म्हणून ओळखले जात आहेत. प्रधान मंत्री पीक विमा योजनेमधून शेतकर्‍यांच्या पिकाची झालेली नुकसान भरपाई दिली जात असते. या योजनेमधून खरीप हंगाम 2022 मध्ये शेतकर्‍याच्या सोयाबीन पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आणि नुकसान झालेल्या शेतकर्‍याकडून खरीप 2022 मध्ये सोयाबीन या पिकाचा विमाही भरण्यात आला होता किंवा शेतकर्‍यांनी सोयाबीन या पिकाचा विमा मुदतीमध्ये भरला होता.

अवेळी पडणार्‍या पावसामुळे सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते हे मान्य करून या हंगामातील सोयाबीन नुकसानीसाठी जिल्ह्यातील 43 महसूल मंडळाला विमा देण्यात येणार असल्याचे मान्य देखील केले होते. परंतु कंपंनीच्या काही प्रतींनिधिकडून सर्वे केल्याचे सांगत जिल्ह्यातील 43 पैकी 28 महसूल मंडळाला कंपांनीकडून विमा मंजूर करण्यात आला. आणि 19 महसूल मंडळाचा विमा नामंजूर करण्यात आला परंतु जिल्ह्याचे कृषि अधीक्षक अधिकारी जेजूरकर साहेब यांनी सर्व प्रकारचे प्रशासकीय प्रयत्न करून आणि कंपनीने काढलेल्या त्रुटीची पूर्तता करून 19 महसूल मंडळावर कंपांनीकडून झालेल्या अन्यायाला लढा देत अखेर त्या 19 महसूल मंडळाला विमा मंजूर करून दिला.

पीक विमा मंजूर झालेले महसूल मंडळे पुढीलप्रमाणे

बीड, ब्रम्हनाथ येळंब, दौला वडगाव, धोंडराई, दिंडरुद, गोमळवाडा, होळ, कवडगाव बु. , कुर्ला, नाळवंडी, पाचेगाव, पाडळसिंगी, परगाव सिरस, पेंडगाव, राजुरी न. , रेवकी, शिरूर कासार, तलवडा, तिंतरवणी या 19 महसूल मंडळाला जवळपास 13 कोटी 53 लाख एव्हढी रक्कम शेतकर्‍याच्या खात्यावर आठ दिवसाच्या आत जमा होणार आहे.

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...