Breaking News

भास्करराव पेरे यांच्या पाटोद्यानंतर वंजारवाडी ची राज्यात चर्चा

भास्करराव पेरे यांच्या पाटोद्यानंतर वंजारवाडी ची राज्यात चर्चा


वाळू झाली स्वस्त 


भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत परंतु आपल्या देशात खूप काही खेडे आहेत ते पाहून असे वाटते की अजून आपला देश पारतंत्र्यातच आहे. त्या आशा विकासापासून कोसो दूर असणाऱ्या गावाच्या विकासाचे काय होणार त्यांचा विकास कोण करणार स्थानिक चे लोकप्रतिनिधी फक्त कामापुरतेच त्या गावकऱ्यांना जवळून पोकळ आश्वासने देतात म्हणजेच एखादी निवडणूक जवळ आली की स्थानिक प्रतिनिधी आम्ही तुमच्या गावाला हे देऊ ते देऊ तुमच्या गावाचा विकास करून असे त्या गावातील लोकांना आश्वासने देतात परंतु एकदा का निवडणुका किंवा त्या लोकप्रतिनिधींचे गावकऱ्यांकडून काम झाले की परत कोणताही लोकप्रतिनिधी गावाच्या विकासासाठी किंवा गावाला दिलेल्या विकास करण्याच्या शब्दाला जागत नाही आणि ते सर्व मुद्दामहून विसरून जातात.

            या उलट काही गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की त्या गावांचे सर्व लोक आनंदाने आणि उत्साहाने चांगले जीवन जगत आहेत. मोठ्या सिटी मध्ये लोकांची गजबज धावपळीचे जीवन आणि प्रदूषण हे सर्व आपल्याला पाहायला मिळते परंतु ग्रामीण भागामध्ये सर्व नैसर्गिक रित्या जीवन जगायला मिळते. महाराष्ट्र मध्ये हिवरे बाजार राळेगणसिद्धी त्यानंतर औरंगाबाद मधील पाटोदा आणि त्यांच्या पाठोपाठ आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये तांदळे यांच्या वंजारवाडी या गावाची चर्चा सुरू आहे त्याचे कारण त्यांनी मेहनत घेऊन वंजारवाडी गावचा केलेला सर्वांगीण विकास आहे.

हे आधार कार्ड होणार बंद


            आजच्या ब्लॉगमध्ये आपण या महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चेमध्ये असणाऱ्या वंजारवाडी या गावच्या विकासाबद्दल माहिती देणार आहोत.

            केले तर होतेच फक्त करणारा पाहिजे असे सांगणारे वंजारवाडी येथील सरपंच श्री तांदळे नाना यांनी वंजारवाडी या गावचा कायापालट करून दाखवला आहे. तांदळे नाना हे वंजारवाडी गावचे तीस वर्षापासून चे सरपंच पद सांभाळत आहेत. म्हणजे तीस वर्षापासून वंजारवाडी ग्रामपंचायत श्री वैजनाथ तांदळे नाना यांच्या ताब्यात आहे आणि गावकऱ्यांना याबद्दल थोडीही खंत वाटत नाही गावकऱ्यांना असे वाटते की आपण वंजारवाडी हे गाव ज्यांच्या ताब्यात दिले त्यांनी आपण दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या सार्थकपणे पार पाडल्या. नाना हे गावामध्ये कोणतेही विकासाचे काम करायचे असल्यास गावाची मीटिंग घेतात आणि त्या मीटिंगमध्ये सर्वानुमते ज्या पद्धतीने काम करण्याचे ठरेल त्याच पद्धतीने विकास कामे करतात वंजारवाडी या गावांमध्ये सर्व रस्ते तीस ते चाळीस फुटी रुंदीचे आहेत गावांमध्ये कोठेही आणि कुणीही अतिक्रमण केलेले नाही आणि जे अतिक्रमणे होती ती सरपंच यांनी गावात नियोजन करून अतिक्रमणधारकांना जागेची व्यवस्था करून देऊन ते अतिक्रमण योग्य पद्धतीने दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या पद्धतीने सर्व अतिक्रमणे हटवून वंजारवाडी गावातील सर्व रस्ते हे 40 फूट रुंदीचे सिमेंटचे किंवा डांबरी बनवलेली आहेत.

            वंजारवाडी गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाकडून पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाण्याचा प्लांट उभारण्यात आला आहे हा प्लांट सर्व गावकऱ्यांसाठी मोकळा आहे त्यामध्ये कॉइन बॉक्स बसवण्यात आला आहे त्यामध्ये एक रुपया टाकला तर एक लिटर पाणी मिळते आणि पाच रुपये टाकले तर वीस लिटर पाणी मिळते या पद्धतीने आवश्यकतेनुसार गावातील सर्व नागरिक पाणी घेऊन जातात.


            त्याच पद्धतीने वंजारवाडी गावामध्ये ग्रामपंचायत कडून सर्व प्रकारच्या पिठाच्या गिरणी उभारण्यात आले आहेत त्यामध्ये सुद्धा ज्याला वाटेल त्याने त्याचे कोणत्याही प्रकारचे दळण ग्रामपंचायतच्या गिरणी मधून दळून घेऊन जाऊ शकतो त्याचीही ग्रामपंचायत कार्यालयाने नाममात्र फीस ठेवली आहे एक रुपयाला एक किलो दळण कशी त्यांची फिस आहे.


            त्याचप्रमाणे वंजारवाडी गावामध्ये मोठे सुसज्ज किराणा दुकानही ग्रामपंचायत मार्फत उभारण्यात आलेले आहे. या किराणा दुकानांमध्ये सर्व प्रकारचे किराणा आणि सर्व प्रकारचे ग्रह उपयोगी वस्तू मिळतात गावकऱ्यांना कोणतीही वस्तू किंवा कोणतेही सामान घेण्यासाठी बाहेर शहरांमध्ये जाण्याची गरज लागत नाही.

            वंजारवाडी येथे ग्रामपंचायत कडून सर्व प्रकारच्या डाळी बनवण्याच्या गिरणी तसेच मिरची कांडम यंत्र अशा सर्व प्रकारच्या सुविधा ग्रामपंचायत कडून चालू करण्यात आले आहे आणि किराणा दुकान गिरणी या सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये ग्रामपंचायत ने कर्मचारी नेमून दिलेले आहेत ते कर्मचारी या सर्व व्यवसाय चालवतात आणि सर्व व्यवस्थित हिसाब ठेवतात.

            ग्रामपंचायत कडून चालू करण्यात आलेल्या सर्व व्यवसायामध्ये ग्राहकांना सहा महिन्यापर्यंत उधारीवर सामान पुरवले जाते व नंतर सहा महिन्यानंतर त्याचा हिसाब काढून उधारी वसूल केली जाते या सर्व व्यवसायामधून होणाऱ्या नफ्यामधून हे व्यवसाय चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि ्यामधून उरणारे पैसे गावाच्या विकासासाठीनियोजन करून खर्च केले जातात वंजारवाडी ग्रामपंचायत ने चालू केलेल्या सर्व प्रकारच्या व्यवसायला लोककल्यान हे नाव देण्यात आले आहे. 

            हे सर्व करताना वंजारवाडी येथील सरपंच श्री तांदळे नाना यांनी त्यांचा स्वतःचा विकासाचा एक आराखडा तयार केला आहे. आणि हे सर्व विकास कामे करताना ते सर्व गावकऱ्यांना विश्वासात घेऊनच सर्व कामे करतात.

राष्ट्र संत श्री भगवान बाबा मंदिर 

            नाना यांनी गावांमध्ये प्रत्येक घरासमोर एक आंब्याची झाड लावण्यास दिले आहे. आणि ते झाड संभाळण्याची प्रत्येक घराची जिम्मेदारी असेल असे सर्वांना सांगितले आहे आणि गावकऱ्यांनी सर्व झाडे व्यवस्थित रित्या सांभाळून त्यांना चांगल्या प्रकारे जगवले आहे त्याचप्रमाणे गावांमध्ये भरपूर प्रमाणात जांभळी चे झाडे देखील लावण्यात आली आहेत. या गावांमध्ये सर्वत्र हिरवळच हिरवळ दिसत आहे. सरपंच यांनी रोजगार हमीच्या माध्यमातून गावातील तलाव गाळमुक्त केला आहे. त्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवून शेतीसाठी त्याचा उपयोग झाला आहे. त्याचप्रमाणे गावातील नदीवर वेगवेगळ्या ठिकाणी जिथे गरज असेल तिथे जवळपास 18 चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचे बंधारे बांधले आहेत. त्यामुळे वंजारवाडी गावातील सर्व शेतकरी चांगले उत्पादन घेऊन सुखी आहेत. वंजारवाडी गावामध्ये मधोमध एक भव्य राष्ट्र संत श्री भगवान बाबा यांचे मंदिर आहे. त्या मंदिराचा वेगवेगळ्या फंडाच्या माध्यमातून नाना यांनी कायापालट करून टाकला आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप मंदिर परिसर अतिशय सुंदर परिसरात बसण्यासाठी केलेली व्यवस्था हे सर्व आवर्जून पाहण्यासारखे आहे. याच मंदिरामध्ये गावातील सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होतात तसेच गावात होणारे विवाह याच मंदिरामध्ये नाममात्र फीस देऊन करण्यात येतात. त्याचप्रमाणे गाव परिसरातील ज्या ज्या ठिकाणी नागरिक एकत्र येतात किंवा बसतात त्या त्या ठिकाणी सावलीसाठी झाडे आणि बसण्यासाठी बाकडे अशी सुसज्ज व्यवस्था सर्व गावांमध्ये करण्यात आलेली आहे.


             गावामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी सुसज्ज उद्यान बनवण्याची कल्पना त्यांच्या मनामध्ये आहे. वंजारवाडी गावामध्ये केलेली सर्व विकासकामे शासनाचा ग्रामपंचायतला येणारा फंड वेगवेगळ्या शासकीय योजना आणि वेगवेगळे शासनाचे फंड यामधून केला आहे. आणि आवश्यकता लागेल तेथे लोकसहभागातून तसेच लोकश्रमदानातून विकास कामे केली आहे. वंजारवाडी गावकरी आणि सरपंच यांचे म्हणणे आहे वंजारवाडी हे गाव आम्ही राज्यातच नाही तर देशात आदर्श गाव करणार आहोत. या अशा विकसित आणि आदर्श गाव व आदर्श सरपंच यांचा सर्व लोकप्रतिनिधी यांनी आदर्श घेतला तर देशातील कोणतेच गाव विकासापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...